CM Eknath Shinde | टाटा एअरबस प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यापासून राज्यात मोठे राजकीय चक्रीवादळच तयार झाले आहे. आधीच बंडखोरीची भांडणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात आहेत. त्यात राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने नवनवीन वाद सुरु होत आहेत. वेदांता फॉक्सकॉननंतर (Vedanta Foxconn) आता लढाऊ विमाने तयार करणारा टाटा एअरबस (Tata Airbus) हा प्रकल्प देखील गुजरातला गेला. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना पाण्यात पाहत आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात टाटा एअरबसवरुन जे काहूर माजले आहे, त्याला उत्तरे उद्योग मंत्री देत आहेत. आणि वेळ पडल्यास मी देखील त्याला उत्तर देईन. भविष्यात महाराष्ट्र राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील तरुणांच्या हाताला आम्हाला कामे द्यायची आहेत. पंतप्रधानांनी देखील आम्हाला महाराष्ट्रात मोठे प्रकल्प देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात जे प्रकल्प राज्यात सुरु केले होते. त्याला महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात स्थगिती देण्यात आली होती. ते प्रकल्प आम्ही पुन्हा सुरु केले आहेत, असे शिंदे (CM Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत, असा आरोप केला होता.
त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना दिली आहे. आमच्या मंत्रिमंडळाने अनेक नियम डावलून शेतकऱ्यांना सढळ हस्ते मदत केली.
निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आम्ही पैसे वाटले आहेत.
आतापर्यंत सहा हजार कोटी शेतकऱ्यांना वाटण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी माहिती घेऊन टीका करावी, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde replied to alligation of tata airbus project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Patil | ‘पवार कुटुंबातील आवडता नेता कोण? शरद पवार की अजित पवार?’ रोहित पाटील यांचे खुमासदार उत्तर

Jaya Bachchan | जया बच्चन यांचा नातीला अजब सल्ला, ‘लग्न न करताही तू आई बनू शकतेस’