CM Eknath Shinde | दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही, ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महानगरपालिकेतील (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) भ्रष्टाचारविरोधात ठाकरे गटाकडून 1 जुलै रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने (CAG) ताशेरे ओढले. एसआयटीची (SIT) स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखलची जमीन सरकली आहे, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

 

ठाकरे गटचा पालिकेवर मोर्चा

शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray group) 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

त्यांच्या पायाखालची जमीन सरकली

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. गेली 15-20 वर्षे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब कॅग विचारणार आहे. एसआयटी स्थापन झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. दूध का दूध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांटे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशेऱ्यावर एसआयटी लावली आहे. ती निष्पक्षपणे काम करेल. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या तिजोरीत राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. ही केवीलवाणी धडपड असल्याचे शिंदे म्हणाले.

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde slams uddhav thackeray and thackeray group over virat morcha on bmc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe

Pune Police Inspector Transfers | 14 Police Inspectors transferred in Pune; They include senior PIs of Swargate,
Mundhwa, Khadki, Alankar, Warje Malwadi, Uttam Nagar, Khadak and Koregaon Park police stations