CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल, ”माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगे-सोयऱ्यांच्या घरी”

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | दहा दिवसांच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2023) आक्रमक झालेल्या विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना चारही बाजूंनी घेरले होते. सत्ताधारी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले. आज शेवटचा दिवस सुद्धा आरोप-प्रत्यारोप व खडाजंगीने गाजला. या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीकास्त्र डागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेला आहे. महाविकास आघाडीचे वरीष्ठ नेते दिल्लीत जागावाटपात व्यग्र असल्याने त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. दिशा सालियान प्रकरणात (Disha Salian case) काही सदस्यांनी मते मांडल्यामुळे आधीच दिशाहीन विरोधी पक्षाचे गलबत आणखीनच भरकटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण तीच योजना अनेक भागांमध्ये राबवण्याची मागणी केली. त्यावरून विरोधी पक्ष किती गोंधळलेला आहे हे दिसते. वस्तूस्थिती जाणून आरोप करा. आरोपाला आरोप करण्यात अर्थ नाही.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्षपद मला मिळू नये यासाठी पडद्याआडून प्रयत्न झाले. मी मराठा समाजासाठी काम करेन ही भीती अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हाही म्हटले चव्हाण अध्यक्ष होत असतील, तर होऊ द्या. जे काही साटेलोटे केले, डावलले तो विषय झाला गेला गंगेला मिळाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, माझे कुटुंब,
माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगे-सोयऱ्यांच्या घरी..
जनतेनं फिरावं दारोदारी.. अशा पद्धतीने काम करणारे लोक
जनतेचे कसे भले करू शकतात? रस्ते बनवणाऱ्या कंपनीला
ऑक्सिजन पुरवण्याचे काम देऊन त्यांनी आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणले.
आरोग्य व्यवस्था चोख असल्याचे भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात
एक क्रमांकाचे मुख्यमंत्री असे प्रमाणपत्र मिळवले. ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते.

शिंदे यांनी कोविड काळात भ्रष्टचार झाल्याचा गंभीर आरोप करताना म्हटले की, कोविड काळात महापालिकेतील भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा या अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षाही सुरस आहेत, अकल्पित आहेत.

शिंदे पुढे म्हणाले, आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. या प्रकरणातील एक महत्त्वाचे प्यादे हा रोमिन छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचे बांधकाम करण्याचे कंत्राट दिले. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटे देण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे आघाडी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हणाले, रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले.
कोण आहे हा? कशासाठी दिले? गंमत म्हणजे त्याचं
ऑबोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्यांचे दुकान होते.
कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे सगळे
पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले.
पैशांच्या खेळांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, याच कंपनीला पुढे महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर
प्युरिफायरचे आणि अंडर वॉटर लाईट, फिल्टर बसवण्याचे काम दिले.
ज्यू हाऊसमध्ये हाऊसकीपिंगचे काम दिले.
म्हणजे तो मल्टी टॅलेंटेड, मल्टिपर्पज माणूस आहे.
सबका मालिक एक. आणखी बरीच कंत्राटे दिलीत.
ते वाचून माझे डोके गरगरायला लागले, तुमचेही गरगरायला लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘मी आताच जेलमधून सुटून आलोय’, जेवणाचे बिल न देता खंडणीची मागणी; आरोपीला अटक, चाकण परिसरातील घटना

घर रंगवण्यासाठी आला अन् दागिन्यांवर हात साफ केला, चिंचवडमधील घटना

पतीच्या प्रेयसीला मारहाण करुन डोक्यात मारला सिमेंटचा गट्टू, माय-लेकींवर गुन्हा दाखल; चतु:श्रृंगी मंदिरातील घटना