Pune Pimpri Chinchwad Crime News | घर रंगवण्यासाठी आला अन् दागिन्यांवर हात साफ केला, चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | रंगकाम करण्यासाठी आलेल्या पेंटरने घरातून दागिने आणि रोकड असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार चिंचवड (Chinchwad) येथील कृष्णानगरमध्ये 29 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 च्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी परप्रांतिय पेंटरवर नऊ महिन्यानंतर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रोहित तानाजी काटकर Rohit Tanaji Katkar (वय-34 रा. माधवकुंज सोसायटी, कृष्णानगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि.19) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज सिंग (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटकर यांच्या घरामध्ये रंगकाम सुरु होते. त्यावेळी सुरज सिंग हा पेटिंग काम करत असताना त्याने घरातून 79 ग्रॅम वजनाचे 3 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व 15 हजार रोख रक्कम असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

फिर्यादी रोहित काटकर आणि आरोपी सुरज सिंग हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
घरात चोरी झाल्याचा प्रकार काटकर यांच्या लक्षात
आल्यानंतर त्यांनी सुरजकडे विचारणा केली.
त्यावेळी त्याला मुद्देमाल परत करण्यास सांगितले.
मात्र, त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही.
अखेर रोहीत काटकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी सुरज विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पतीच्या प्रेयसीला मारहाण करुन डोक्यात मारला सिमेंटचा गट्टू, माय-लेकींवर गुन्हा दाखल; चतु:श्रृंगी मंदिरातील घटना

कोयता गँगची आंबेगावमध्ये दहशत, गाडीला कट मारल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; 3 जणांना अटक

कामगारांनी बेकरीतील 8 लाखांची रोकड पळवली, भवानी पेठेतील घटना

जातनिहाय जनगणनेसाठी मुख्यमंत्री सकारात्मक, समाजातील सर्व घटाकांचे मत ऐकून निर्णय घेऊ आणि…

पैशासाठी विवाहितेचा छळ, खडकवासला धरणात ढकलून देण्याचा प्रयत्न; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

भुजबळ अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील ३ आरोपी ‘माफी’चे साक्षीदार होणार, सुनावणीस कोर्ट तयार!