Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीच्या प्रेयसीला मारहाण करुन डोक्यात मारला सिमेंटचा गट्टू, माय-लेकींवर गुन्हा दाखल; चतु:श्रृंगी मंदिरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन पत्नीने पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. तर मुलीने डोक्यात सिमेंटचा गड्डु घालून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना चतु:श्रृंगी माता मंदिराच्या कमानीच्या आतील कॅन्टीन समोर रविवारी (दि.17) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सेनापती बापट रोडवर (Senapati Bapat Road) राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. यावरुन वडारवाडी येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिला आणि तिच्या 21 वर्षीय मुलीवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे आणि फिर्यादी यांचे पूर्वी प्रेमसंबंध (Love Affair) होते. फिर्यादी त्याच्यासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन आरोपी महिलेसोबत पूर्वी वाद झाले होते. यामुळे फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात (Pune Police) तक्रार दिली होती. याचा राग महिलेच्या मनात होता. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी चतु:श्रृंगी माता मंदिरात (Chatushrungi Mata Temple) गेल्या होत्या.

त्यावेळी आरोपी महिला आणि त्यांची मुलगी मंदिरात आल्या.
‘तु माझ्या नवऱ्यासोबत का बोलतेस, का भेटतेस’ असे म्हणून
महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तर मुलीने केस पकडून सिमेंटचा गट्टू फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन
गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोयता गँगची आंबेगावमध्ये दहशत, गाडीला कट मारल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; 3 जणांना अटक

Maratha Reservation | पंतप्रधान मोदींकडून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची ग्वाही, उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली भेट

कामगारांनी बेकरीतील 8 लाखांची रोकड पळवली, भवानी पेठेतील घटना