CM Eknath Shinde | मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध सरकारचं मोठं पाऊल, मुख्यमंत्र्यांनी दिले थेट निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विनापरवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या (Drunk and Drive) सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा (Non Bailable Offence) दाखल करण्यासंदर्भात आज (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला (Central Government) पाठविण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई (Legal Action) आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway), समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील ठिकाणी अपघात (Accident) टाळण्यासाठी सूचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक (Maharashtra DGP) रजनीश सेठ (IPS Rajnish Seth), गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रविंद्र सिंघल (Additional DG Ravinder Singal), परिवहन आयुक्त विवेक भिमनवार (Vivek Bhimanwar) आदी यावेळी उपस्थित होते.

बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप
प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2021 मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या
अपघातांची संख्या 20 हजार 860 आहे तर त्यात 9829 जणांचा मृत्यू झाला आहे.

गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा
करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील
वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी
वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी
वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title :-  CM Eknath Shinde | cm eknath shinde will make reckless driving a non bailable offence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकवासल्यातून बचावलेल्या सात वर्षांच्या कुमुदला पडली ऑक्सिजनची गरज

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)