CM Eknath Shinde | ‘रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’; जाणून घ्या एकनाथ शिंदे यांचा रंजक प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | शिंदे गटाने बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात आधीच भूकंप झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. अखेर भाजप (BJP) आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. आणि पत्रकार परिषदेत बोलताना ‘एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील,’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. दरम्यान एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आहेत.

 

ठाणे जिल्ह्यातील (Thane) शिवसेनेची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदावर वर्णी झाले आहेत. रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे. एकनाथ शिंदे यांची सध्या राज्यभर नाहीतर देशभर चर्चा पसरली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे मागील अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 2019 साली शिवसेना-भाजप युती तुटली आणि राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्यासोबत (Congress) महाविकास सरकार (Mahavikas Sarkar) स्थापन झालं. या सरकारमध्ये शिंदे नगरविकासमंत्री होते.

 

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच असल्यानं लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गावाला रामराम केलं. आणि ठाण्यात दाखल झाले आहे. ते तिथेच स्थायिक झाले. ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून ११ वीचे शिक्षण पूर्ण केले. अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. आणि आपल्या नोकरीकडे लक्ष केले.

दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून शिंदे गटांनी मोठं बंड स्विकारलं. बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला गेले. तेथून काही दिवसांनी गुवाहाटीला गेले.
त्यानंतर काल गोव्यात दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटातील आमदारही भाजपसोबत युती करा असं आवाहन देत होते.
अखेर सरकार स्थापन झालं हे निश्चित झालं आहे. सध्या शिंदे गटात जवळपास 50 इतके आमदार आहेत.
दरम्यान एकनाथ शिंदेची नेमकी राजकीय कारकीर्द कशी आहे.? याबाबत जाणून घ्या.

 

“एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द” –

1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, 3 वर्षे स्थायी समिती सदस्य, 4 वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

2004, 2009, 2014, 2019 चार वेळा आमदार.

2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते.

12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्षनेता.

5 डिसेंबर 2015 ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री.
तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री.

ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते.

नोव्हेंबर 2019 पासून नगरविकास व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री.

जून 2022, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी..

 

Web Title :- CM Eknath Shinde | From rickshaw driver to Chief Minister of Maharashtra know the interesting journey of Eknath Shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा