CM Eknath Shinde | ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, कायदा हाती घेऊ नये’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भावनीक आवाहन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते. मात्र आंदोलनकांना उपोषणासाठी (Jalna Maratha Reservation Protest) विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर लाठीचार्ज (Jalna Police Lathi Charge) केला. यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केली. यावेळी आक्रमक आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार (Firing) केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल बोलताना जनतेने शांतता राखावी, असे आवाहन केलं होतं. त्यानंतर आज (शनिवार) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील (Jarange Patil) यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी (Collector) आणि पोलीस अधीक्षक (Superintendent of Police (SP) तिथे गेले. जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी (High Level Inquiry) करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे.

नोव्हेंबर 2014 मध्ये युतीची सत्ता असताना सरकारने मराठा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयाने (High Court) ग्राह्यही ठरवला. पण,
आपल्याला माहितच आहे सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) वेगळा निर्णय आला.
हे कोणाच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे हे सगळ्यांना माहिती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. न्यायालयात राज्य शासन पूर्ण तयारीने हा खटला लढत आहे.
त्यासाठी नामवंत वकील आणि घटनातज्ज्ञांची फौज शासनाने उभी केली आहे.
हा मुद्दा घटनात्मक (Constitutional) असल्यामुळे काही अडचणी आहेत,
त्या दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची (Cabinet) एक उपसमिती गठीत केलेली आहे.
आरक्षण मिळवण्यासाठी ज्येष्ठ आणि तज्ज्ञ वकीलांचा टास्क फोर्स स्थापन करून त्यांच्या
सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब आरोग्य योजनेतील वार्षिक
उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत वाढणार

Maratha Reservation Protest | शांततेने सुरू असलेले जालन्यातील आंदोलन पेटले कसे?