CM Eknath Shinde | ‘एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली, घरात बसून चर्चा करत नाही’, समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं (व्हिडिओ)

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway) शिर्डी ते भरवीर या 80 किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकर्पण शुक्रवारी (दि.26) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित पार पडला. शीर्डीजवळील कोकमठाण येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

https://twitter.com/mieknathshinde/status/1662052899109883906?s=20

घरात बसून चर्चा करत नाही

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. काल परवा सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सरकारचा मार्ग मोकळा केला. तसाच आम्ही समृद्धी महामार्गाचा मार्ग मोकळा केला. आम्ही दिलेला शब्द पाळतो, आणि दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. त्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य असून ते कर्तव्य आम्ही पार पाडत असतो. आम्ही जे काही करतो ते जाहीरपणे करतो. जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करत नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

बंद खोलीत कोणी काय म्हटले…

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, बंद खोलीत कोणी काय म्हटले ते कोणालाच समजत नाही. त्यामुळे काहीही वाकडं तिकडं बोलायला मोकळे. पण कालांतराने सगळं सत्य समोर येतं, ते काही लपत नसतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्याच आहेत, त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना चिमटा काढला. ते पुढे म्हणाले, आमचं जे काही असतं ते मोकळं असतं. पोटात एक ओठात एक असं कधीच नसतं. त्यामुळेच अशा प्रकारचे महत्त्वकांक्षी प्रकल्प हे वेळेत पूर्ण होऊ शकतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगतले.

शेतकऱ्यांचे भविष्य घडवणारा रस्ता

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली.
पंतप्रधानांनी सगळे अडथळे दूर केले म्हणून 600 किमीचा रस्ता पूर्ण करु शकलो.
हा शेतकऱ्यांचं भविष्य घडवणारा रस्ता आहे. आम्ही चार तासात पोहोचलो.
तुम्ही पाच तास घ्या पण सुरक्षेची काळजी घ्या, असे आवाहन करत भविष्यात असेच प्रकल्प करायचे आहेत,
हे सर्वसामान्य जनतेचं सरकार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title :  CM Eknath Shinde | nagpur to mumbai samruddhi mahamarg second phase shirdi to
bharvir inaugurated by cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा