CM Eknath Shinde On BMC | मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानातील सोयीसुविधांबाबत विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : CM Eknath Shinde On BMC | मुंबईकरांसाठी (Mumbaikar) शहराचा विकासात्मक बदल करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच उद्यानामध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत दिवे, सुरक्षा याबाबत विकास आराखडा (Mumbai DPR) तयार करण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde On BMC) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

विधानसभा सदस्य आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
हद्दीतील हायवेला चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. महानगर पालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये
ज्येष्ठ नागरिक तसेच मुले येत असतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
पोशा नाखवा मैदानातील दिव्यांच्या दुरुस्तीचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सदस्य छगन भुजबळ
(Chhagan Bhujbal), नाना पटोले (Nana Patole), योगेश सागर MLA Yogesh Sagar),
अजय चौधरी (MLA Ajay Chaudhary) यांनी सहभाग घेतला.

Web Title :  CM Eknath Shinde On BMC | Chief Minister Eknath Shinde will prepare a development plan regarding the facilities in the parks in the Brihanmumbai Municipal Corporation area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalyukt Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुणे जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित