छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Nana Patole | जालन्यात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सांगण्यावरुन उपोषण केले होते, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना मुख्मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पटोले यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. काहीतरी गंभीर आरोप केल्यावर दखल घेतली जाईल असे त्यांना वाटते. जरांगे यांनी माझ्या आवाहनाला मान दिला. (CM Eknath Shinde On Nana Patole)
छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, नाना पटोले माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की, यामध्ये एकनाथ शिंदे यांचा किंचित तरी हात आहे का?, पोटात एक आणि ओठावर एक असे काम मी करत नाही. (CM Eknath Shinde On Nana Patole)
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की, देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. पण आंदोलकांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे.
त्यावर शिंदे म्हणाले, समाजाची दिशाभूल होता कामा नये. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे, ज्यांच्या नोंदी पूर्वी निजामकालीन असतील. ज्यांच्यावर कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली असेल तर त्याचा सर्व्हे केला जाईल. अशा लोकांची माहिती मिळवली जाईल आणि खरच कुणबी असेल तर त्याला ओबीसी दाखला मिळेल. ओबीसींना देखील यावर काहीच आक्षेप नाही.
पण, त्यांचा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यावर आक्षेप आहे. तसेच अशी राज्याची अशी कोणतीही भूमिका, विचार नाही की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाचे आरक्षण आहे तेवढेच ठेवून, मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे ते आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. यासाठी सरकारचे काम सुरु आहे.
जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही.
एका महिन्याचा शब्द पाळणार काय, यावर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत.
काय म्हणाले होते नाना पटोले
नाना पटोले म्हणाले होते की, जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते.
३१ तारखेच्या मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे
आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती.
या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना
उपोषणाला बसवले होते हे आता सिद्ध झाले आहे. कारण सौम्य लाठीचार्ज झाला आणि फडणवीसांनी माफी
सुद्धा मागितली. दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
अल्पवयीन मुलाचा डोक्यात वार करुन खून; हडपसर पोलिसांकडून आरोपींना दोन तासात अटक