Pune Traffic Police – Parking Spaces | पुण्यात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था; जाणून घ्या कुठं-कुठं आहे पार्किंगची सोय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police – Parking Spaces | दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, रोषणाई पाहण्यासाठी शहरातील तसेच शहराबाहेरील नागरीक मोठ्या प्रमाणात येत असतात. नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा तसेच नागरिकांना आपली वाहने सुरक्षीत पार्क करता यावी यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच मध्यवस्तीतील रस्त्यांवर वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली असून रस्त्यांच्या आजूबाजूला वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune Traffic Police – Parking Spaces)

पार्किंग व्यवस्था 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर (गणेश विसर्जन) दरम्यान असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत रोषणाई व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी तसेच विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी पार्क करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. (Pune Traffic Police – Parking Spaces)

वाहनांसाठी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था कंसात वाहनाचा प्रकार

 1. न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग (दुचाकी)
 2. शिवाजी आखाडा वाहनतळ (दुचाकी/चारचाकी)
 3. देसाई कॉलेज (पोलीस पार्किंग)
 4. हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ (दुचाकी/चारचाकी)
 5. गोगटे प्रशाला (दुचाकी)
 6. एसपी कॉलेज (दुचाकी)
 7. नदीपात्रालगत (दुचाकी/चारचाकी)
 8. शिवाजी मराठा शाळा (दुचाकी)
 9. नातुबाग (दुचाकी)
 10. पीएमपीएमएल मैदान पुरम चौकाजवळ (चारचाकी)
 11. पेशवे पार्क सारसबाग (दुचाकी)
 12. हरजीवन हॉस्पिटल समोर सावरकर चौक (दुचाकी)
 13. पाटील प्लाझा पार्किंग (दुचाकी)
 14. मित्रमंडळ सभागृह (दुचाकी)
 15. पर्वती ते दांडेकर पुल (दुचाकी)
 16. दांडेकर पुल ते गणेश मळा (दुचाकी)
 17. गणेश मळा ते राजाराम पुल (दुचाकी)
 18. निलायम टॉकीज (दुचाकी/चारचाकी)
 19. विमलाबाई गरवारे हायस्कुल (दुचाकी)
 20. आबासाहेब गरवारे कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
 21. संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान (दुचाकी/चारचाकी)
 22. आपटे प्रशाला (दुचाकी)
 23. फर्ग्युसन कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
 24. जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान (दुचाकी/चारचाकी)
 25. मराठवाडा कॉलेज (दुचाकी)
 26. एसएसपीएमएस कॉलेज (दुचाकी)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ

आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023 |गणेशोत्सवासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत करता येणार प्रवास;
जाणून घ्या वेळापत्रक

Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाले – ‘मी दिरंगाई केलेली नाही…’

Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार,
अजित पवार समर्थक आक्रमक

Maharashtra Politics | ‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी; काँग्रेसचा महायुतीवर आरोप