Pune Crime News | अल्पवयीन मुलाचा डोक्यात वार करुन खून; हडपसर पोलिसांकडून आरोपींना दोन तासात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सहा जणांनी एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करुन निर्घृण खून केल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात (Murder In Hadapsar Pune) घडली आहे. या गुन्ह्यातील फारार आरोपींना हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दोन तासात अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.17) हडपसर येथील मिरेकर वस्ती मधील सार्वजनिक शौचालयाच्यावर घडला होता. (Pune Crime News)

स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे (वय-17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर आकाश हनुमंत कांबळे (वय-23 रा. मिरेकर वस्ती हडपसर), अमन शेख, आकाश कांबळे व तीन अल्पवयीन मुलांवर हडपसर पोलीस ठाण्यात आयपीसी 302,34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अॅमेडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाने आरोपींची माहिती गोळा केली. पोलिसांनी आरोपींचा गंजपेठ, स्वारगेट व पुन्हा हडपसर असा पाठलाग केला. पोलिसांनी आकाश कांबळे याच्यासह इतर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मयत स्वप्नील झोंबार्डे याच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन खून केल्याचे सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर करीत आहेत.

Advt.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke), पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले (PI Sandeep Shivle) , विश्वास डगळे (PI Vishwad Dagle) यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde), पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde), पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, कुंडलीक केसकर, रशिद शेख, प्रशांत टोणपे, अनिरुद्ध सोनवणे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | आखाती देशात नोकरीच्या आमिषाने महिलांची छळवणूक, राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांमुळे चार महिला मायदेशी परतल्या

जादुटोणा सारखे अघोरीकृत्य करून 4 कोटी देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची
1 कोटीची फसवणूक ! बिल्डर नादीर नईम आबादी, मौलाना शोएब अत्तार, मजीद अत्तार,
खालिद अत्तार, इरम शोएब अत्तार, सीमा उर्फ रोहिया नादीर नईमाबादी यांच्यावर एम.पी.आय.डी