Pune Cyber Crime | ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एकाला पुणे सायबर पोलिसांकडून अटक

Pune Cyber ​​Police News | 66 lakh online fraud through mobile call, Pune cyber police arrested accused from Bihar

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांनी ‘ऑनलाइन टास्क’च्या (Lure Of Online Task) आमिषाने एकाची 35 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी गुरुवारी (दि.14 सप्टेंबर) मुंबईतून अटक केली आहे. त्यानंतर फसवणूक करणाऱ्या (Fraud Case) टोळीतील आणखी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी ऑनलाईन टास्कमध्ये गुगलवर रिव्ह्यू केल्यास जादा कमिशनचे आमिष दाखवले होते. (Pune Cyber Crime)

तुषार प्रकाश अजवानी Tushar Prakash Ajwani (वय-37 रा. वॉटरफोर्ड जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई) याला 14 सप्टेंबर रोजी मुंबईतून अटक केली होती. आरोपी तुषारने फिर्यादीला ‘पार्ट टाईम’ नोकरीचे (Lure Of Part Time Job) आमिष दाखवून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला. त्यानंतर गुगलवर एका कंपनीला रिव्ह्यू दिल्यास बँक खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. त्यानुसार तुषार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा करुन विश्वास संपादन केला. (Pune Cyber Crime)

फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी ज्यादा फायद्यासाठी टेलिग्रामवर लिंक पाठवून बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी वेळोवेळी 34 लाख 97 हजार रुपये जमा केले. मात्र, कोणताही परतावा न मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी यांनी त्यांची रक्कम ट्रान्सफर केलेल्या आयसीआयसीआय बँक खात्याची माहिती पोलिसांनी प्राप्त केली. तसेच या बँक खात्यातून गुन्ह्यातील काही रक्कम SPAY TECHNOLOGY PVT या पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केल्याची माहिती मिळाली. त्यानुसर पोलिसांनी तुषार अजवानी याला अटक केली. त्याची पोलीस कोठडीत चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याला भारतीय चलनाच्या बदल्यात युएडीटी उपलब्ध करुन देणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी मयुर दिलीप निकम Mayur Dilip Nikam (वय-34 धंदा-ट्रेडिंग, रा. कमान वेस, घोरपडे वाडा, ता. मिरज, जि. सांगली) याला शनिवारी (दि.16) अटक केली. आरोपीला न्यायालयाने 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे (ACP NR Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (Sr PI Minal Supe Patil), पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव (PSI Sachin Jadhav), पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनिल सोनुने, संदेश कर्णे, नितीन चांदणे, शाहरुख शेख व निलेश लांडगे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ

आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023 |गणेशोत्सवासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत करता येणार प्रवास;
जाणून घ्या वेळापत्रक

Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाले – ‘मी दिरंगाई केलेली नाही…’

Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार,
अजित पवार समर्थक आक्रमक

Maharashtra Politics | ‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी; काँग्रेसचा महायुतीवर आरोप

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर