CM Eknath Shinde On Samruddhi Expressway Accident | ‘RTO ने ट्रक थांबवला अन्…’, एकनाथ शिंदेंनी सांगितलं ‘समृद्धी’वरील अपघाताचे कारण (व्हिडिओ)

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Samruddhi Expressway Accident | नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि.14) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक दिली. जखमीपैकी 14 जणांवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणि नऊ जणांवर वैजपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. (CM Eknath Shinde On Samruddhi Expressway Accident)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली असून जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (CM Eknath Shinde On Samruddhi Expressway Accident)

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाने दावा केला आहे की, आरटीओ अधिकाऱ्यांनी एक ट्रक थांबवला होता. हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रकचालक तिथून ट्रक काढत असताना टेम्पो ट्रॅव्हलरची पाठीमागून जोरात धडक बसली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जखमी प्रवाशाच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

https://x.com/mieknathshinde/status/1713470519444726125?s=20

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत विचारण्यात आले.
त्यावर शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
मी या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अपघाताच्या प्राथमिक पाहणीनुसार, आरटीओने ट्रक थांबवला होता.
त्या ट्रकला ही टेम्पो ट्रॅव्हलर बस धडकली. यामध्ये आरटीओचे जे अधिकारी दोषी असतील किंवा ट्रकचा चालक असेल,
जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.
तसेच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र शिंदे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Updates News | नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरातील वाहतूकीत बदल, जाणून घ्या पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी रस्ते