Maharashtra MLA Disqualification Notice | सुनावणीवेळी हजर राहा! ‘या’ ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLA Disqualification Notice | सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर शिवसेनेतील बंडखोरी प्रकरणी (Shiv Sena Rebellion Case) आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे. आमदार अपात्रतेच्या या प्रक्रियेत अपक्ष आमदारांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) , राजेंद्र यड्रावकर (MLA Rajendra Yadravkar) आणि नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांना अपात्रतेची नोटीस विधिमंडळाकडून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरे गटावर आपला संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra MLA Disqualification Notice)

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अशाप्रकारची अपात्रतेची नोटीस आली असल्याचे म्हणत दुजोरा दिला आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, ६ सप्टेंबरला विधिमंडळाकडून अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये १४ सप्टेंबरला सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सुनील प्रभू हे याचिकाकर्ते आहेत. मुळात अपक्ष आमदारांना अशी नोटीस पाठवण्याचा मुर्खपणा त्यांनी केला. (Maharashtra MLA Disqualification Notice)

भोंडेकर म्हणाले, आम्ही धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलो नाही. मग ही नोटीस पाठवण्याचा काय अर्थ आहे हे कळत नाही. सुनील प्रभू हे माझ्यापेक्षा ज्युनिअर आहेत. २००९ मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो होतो त्यानंतर ते आमदार झालेत. मी २-३ वेळा आमदार झालो. आम्ही अपक्ष आहोत, आम्ही एखाद्या पक्षाला समर्थन दिले म्हणजे त्या पक्षाशी बांधील होत नाही.

अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी म्हटले की, अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता, त्यांना नोटीस येण्याचे कारण नव्हते. परंतु त्यांच्या डोक्यात काय हे कळत नाही. बुधवारी सुनावणीवेळी आम्ही उपस्थित राहून म्हणणे मांडू.

याड्रावरकर पुढे म्हणाले, आजपर्यंत इतिहासात कधी घडले नाही. याला कायदेशीर काही आधार नाही.
बहुतेक भीती दाखवण्यासाठी ही नोटीस पाठवली असावी.
मी आणि माझे वकील सुनावणीवेळी उपस्थित राहून केवळ माझीच नव्हे तर नोटीस आलेल्या सर्व अपक्ष आमदारांची बाजू मांडू.

या प्रकरणावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी म्हटले आहे की,
अपक्ष आमदारांनी पक्षात प्रवेश केल्याबाबत काही सह्या केल्या असतील तर १० व्या शेड्युल्डनुसार ही नोटीस आली
असण्याची शक्यता आहे. याबाबत सुनील प्रभू अधिक भाष्य करू शकतात. सध्याची आमदारांची स्थिती काय आहे
यावर अपात्रतेची कारवाई अवलंबून आहे.

मुळ शिवसेनेत उद्धव ठाकरे (Udday Thackeray) यांच्याविरोधात एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)
बंडखोरी करत पक्षातील अनेक आमदारांना सोबत घेतले होते. शिवसेनेचे ५४ पैकी ४० हून जास्त आमदार शिंदेसोबत गेले होते. त्याचसोबत एकनाथ शिंदेंना समर्थन देणारे अपक्ष आमदारही होते. खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदेंना वापरण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात हे न्यायप्रविष्ट आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधीमंडळ अध्यक्षांना दिले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात मोबाईलवर चर्चा, रात्री उशीरा मंत्री सामंतांनी घेतली भेट

13 September Rashifal : कन्या, तुळ आणि कुंभ राशीला नोकरीसाठी चांगला दिवस, वाचा दैनिक भविष्य

Yashomati Thakur On Navneet Ravi Rana | ‘औकातीत रहायच, माझ्या बापाने आणि आम्ही…’
नवनीत राणांच्या आरोपांवर यशोमती ठाकूर भडकल्या