CM Eknath Shinde | ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मैं…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चौफेर फटकेबाजी, शरद पवारांवरही साधला निशाणा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मी दिलेला शब्द पाळतो म्हणूनच 50 लोकांनी म्हणजे आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे (Akhil Bhartiya Badgujar Samaj) महाअधिवेशन पार पडले. या छोटेखानी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

 

या छोट्याशा कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावणार का अशी चर्चा सुरु होती. असे मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक बार जो मैने कमिटमेंट करत दी, तो मै खुद की भी नही सुनता असं म्हटलं. या डायलॉगवर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. ते पुढे म्हणाले, समाज छोटा आहे असं काही नाही, आपण माने मोठे आहात. मी दिलेला शब्द पाळतो म्हणून लोकांनी म्हणजे आमदारांनी विश्वास ठेवला, मी माझ्या राजकीय जीवनात दिलेला शब्द पडू देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले,
शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो.
आजही कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्राचे जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करत आहोत,
असे प्रत्युत्तर त्यांनी शरद पवार यांच्या टीकेला दिले.
शिंदे व भाजप (BJP) सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती.
या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जळगावमध्ये प्रत्युत्तर दिले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | ‘Once I made a commitment, I…’, Chief Minister Eknath Shinde’s all round attack, Sharad Pawar was also targeted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या