CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला, काही लोकांना कोरोना हवा होता, मी कधी बैठक घेतली नाही, पण…

मुंबई : CM Eknath Shinde | राज्य कारभार करताना कधी कोण काय बोलेल त्यामुळे आम्ही गॅसवर असतो. सगळ्यांना माहीत आहे, जसे आपले सरकार आले आणि कोरोना पळून गेला. काही लोकांना कोरोना हवा होता. परंतु कोरोना संदर्भात बैठक घेऊन बाऊ न करता ठोस कारवाई करत आम्ही राज्याला कोरोना मुक्त केले. मी कधी बैठक घेतली नाही, पण बैठक न घेता जे काय करायचे होते ते मी करत होतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे.

ठाण्यातील दिवाळीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले आणि आई कुठे काय करतेमधील अभिनेत्री मधुराणी गोखले उपस्थित होते.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणात (MLA Disqualification Case) टांगती तलवार असल्याने शिंदे सरकार लवकरच जाणार,
आमदार आपात्र होणार, अशी टीका होत असल्याने शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जे जे काही करेन ते मी लोकांच्या हिताचे काम करेन.
सगळे सण अगदी आनंदात साजरे झाले पाहिजेत. आपले सण आपण जोपासले पाहिजेत. समीर चौघुलेंचा मी फॅन आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, प्रदूषण कमी करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. यात आम्हाला यश येईल.
मी किती काय ठरवले तरी मुख्यमंत्री कोणाला करायचे ते जनता जनार्दनाच्या हातात असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लक्ष्मीपूजनानंतर पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी फटाक्यांमुळे 17 आगीच्या घटना

रिक्षा चालकाच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी, बोपोडी मधील घटना; रिक्षाचालकाला अटक