Pune Crime News | रिक्षा चालकाच्या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी, बोपोडी मधील घटना; रिक्षाचालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रिक्षाच्या भाड्यावरुन वाद घालत एका रिक्षाचालकाने प्रवाशाला फरशीच्या तुकड्याने बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केल्याची घटना बोपोडी येथे घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाला खडकी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.11) दुपारी चारच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Old Pune-Mumbai Highway) बोपोडी बस स्टॉपजवळ घडला. (Pune Crime News)

याबाबत बाळासाहेब पोपट झोडगे (वय-56 रा. एलआयसी कॉलनी, औंध रोड, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक साजिद मोहंमद बागवान Rickshaw Driver Sajid Mohammad Bagwan (वय-30 रा. अशोक भोईटे नगर, बोपोडी, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झोडगे यांना बोपोडी मेट्रो स्टेशन येथून एलआयसी कॉलनी औंध रोड येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी रिक्षाचालक आरोपी साजिद याला रिक्षाबाबत विचारणा करुन भाडे किती घेणार अशी विचारणा केली.
त्यावेळी साजिद बागवान याने एलआयसी कॉलनी पर्य़ंत 90 रुपये रिक्षाचे भाडे सांगितले.
त्यावेळी फिर्य़ादी यांनी एलआयसी कॉलनी पर्यंत 50 रुपये भाडे होत असल्याचे सांगितले.
याचा राग आल्याने रिक्षाचालक साजिद याने फिर्यादी यांच्यासोबत आरेरावी करत त्यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी यांना धक्का मारुन खाली पाडून त्याठिकाणी पडलेल्या फरशीच्या तुकड्याने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले.
पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील रोकड लुटली, लोहगाव-वाघोली रोडवरील घटना