CM Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदेंना विश्वासघातकी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीवरून शिंदे गट (Shinde Group) संताप व्यक्त करत आहे. बंडखोरांचा गद्दार, विश्वासघातकी असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने केल्याने बंडखोर नेते तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. शिवाय, भाजपा (BJP) आणि मनसेने (MNS) सुद्धा बंडखोरांच्या बाजूने शिवसेनेवर (Shivsena) टीका करण्याचे सत्र सुरू केले आहे. आता पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (CM Eknath Shinde)

 

केसरकर यांनी म्हटले की, मुख्यमंत्री परदेशात गेले की, इतरांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येते. उद्धव ठाकरे हे आजारी असताना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दुसर्‍या कोणाकडे का दिला नाही. विश्वास ठेवला असता तर विश्वासघात केला असे म्हणू शकता. अन्यथा तुम्हाला विश्वासघातकी म्हणण्याचा अधिकार नाही, असे केसरकर यांनी म्हटले आहे. (CM Eknath Shinde)

 

केसकर म्हणाले, ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वेचले, त्याला तुम्ही मुख्यमंत्रीपद देऊ असे म्हणतात. पण, त्यांनी नम्रपणे नकार दिला. आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससोबतची (Congress) साथ सोडा, असे वारंवार सांगितले होते. पण तुम्ही ऐकले नाही. आम्ही गुवाहाटीवरून परत येण्यास तयार होतो, पण तुम्ही आमचे ऐकले नाही, असे केसरकरांनी म्हटले आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde | you have no right to call eknath shinde a traitor says deepak kesarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | PF खात्यात वार्षिक योगदानावर मिळालेल्या व्याजावर कधी आणि किती लागणार टॅक्स? एक्सपर्टकडून जाणून घ्या सर्व नियम

 

Pune Crime | सराईत गुन्हेगाराचा खून करुन फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

 

ASI Bhaskar Modve Passed Away | तपासासाठी गेलेल्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर (ASI) काळाचा घाला