Pune Crime | सराईत गुन्हेगाराचा खून करुन फरार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गटारी पार्टीत झालेल्या वादातून मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा खून (Murder) झाल्याची घटना पुण्यात गुरुवारी (दि.28) सकाळी उघडकीस आली होती. ही घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishram Bagh Police Station) हद्दीतील पुना हॉस्पिटलच्या (Poona Hospital) मागे असलेल्या मोकळ्या मैदानात घडली. या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत (Pune Crime) गुन्हेगार आहेत.

 

आनंद उर्फ बारक्या गणपत जोरी Anand alias Barkya Ganpat Jori (वय-32 रा. पर्वती दर्शन कॉलनी, पुणे) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर सुधीर उर्फ बंडु गौतम थोरात Sudhir alias Bandu Gautam Thorat (वय-32 रा. कुंभारवाडा, पुना हॉस्पिटलजवळ), संदीप उर्फ सॅन्डी सुरेद्र नायर Sandeep alias Sandy Suredra Nair (वय-28 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

पुना हॉस्पिटलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना नियंत्रण कक्षाकडून (Control Room) मिळाली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार केल्याने त्याची ओळख पटवणे कठिण होते. मृत व्यक्तीजवळ कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र पोलिसांना मिळाले नाही. तसेच घटनास्थळ निर्जन असल्याने त्याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने मृताची ओळख पटवणे कठीण होते. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून मृताची ओळख पटली.

 

पोलिसांनी घटनास्थळावर पडलेल्या जेवणाच्या प्लेट वरुन जवळच्या हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले. त्यापैकी एका हॉटेलमधून मयत आनंद जोरी हा इतर दोन अनोळखी व्यक्तींसोबत जेवणाचे पार्सल घेऊन जाताना दिसला. सीसीटीव्ही वरुन आरोपींचा शोध घेत असताना आरोपी धायरी भागात पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धायरी गावातून आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी संदीप नायर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्द पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचे 2, जबरी चोरी 1 असे 3 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुणे शहर व जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आले आहे. तर सुधीर थोरात याच्यावर दुखापतीचे 2, घरफोडी 1, इतर चोरीचे 7 असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.

मयत आनंद जोरी हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध घरफोडी 8, इतर चोरी 2,
फसवणुकीचा 1. अंमली पदार्थ 1 व तडीपार आदेशाचा भंग केल्या प्रकरणी 3 असे एकूण 15 गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर (API Ashish Kavathekar),
उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), रमेश तापकीर (PSI Ramesh Tapkir)
पोलीस अंमलदार राहुल मखरे, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, दत्ता सोनवणे, शुभम देसाई,
निलेश साबळे, अभिनव लडकत, अयाज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे, रुक्साना नदाफ यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch arrested two persons who absconded after murdering a criminal in an inn

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ASI Bhaskar Modve Passed Away | तपासासाठी गेलेल्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर (ASI) काळाचा घाला

 

Pune Crime | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपींची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता

 

Tata Group | टाटाच्या ‘या’ स्टॉकद्वारे होईल बंपर कमाई ! एक्सपर्टने 540 रुपयांच्या टार्गेट प्राईससह दिले Buy रेटिंग