CM Uddhav Thackeray । भाजप-शिवसेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) दिल्लीत भेट घेतली. त्यावरून राज्यात युतीबाबत चर्चेला उधाण आलं. त्यावेळी अनेक तर्कवितर्क केले जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिल आहे. त्याचबरोबर अधिवेशना दरम्यान भाजपचे (BJP) दोन दिवसाची वर्तणूक ही महाराष्ट्राची मान शरमेनं खाली करणारी होती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदे दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भाजप (BJP) शिवसेना (Shiv Sena) पुन्हा युती होणार अशी चर्चा रंगली आहे असा सवाल पत्रकारांनी विचारला असता त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘मी दोघांच्या (अजित पवार, बाळासाहेब थोरात) मध्ये आहे, मला बाहेर निघायचं असेल तर या दोघांना टाळण शक्य आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकेल का या प्रश्नाला ठाकरी स्टाईलने उत्तर दिलं आहे.

ADV

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही. मुद्दा काय होता.
केंद्राकडे इम्पिरेकल डेटा (Imperial data) मागण्याचा होता. यात नवीन आम्ही काय केलं. जेव्हा
पंतप्रधान मोदींची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची
मागणी देखील केली होती. राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती. याबाबत माहिती
केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर
यात चुकीचं काय आणि एवढ्या मिरच्या जोंबण्याचं कारण काय? असा जोरदार प्रश्न मुख्यमंत्री
ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलाय. तसेच पुढे म्हणाले, ओबीसी समाजाच्या
बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता. असं
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | 10,000 लाच मागितल्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह 2 पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  CM Uddhav Thackeray । will bjp sena alliance again cm uddhav thackeray answer in monsoon session of maharashtra assembly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update