खाते वाटपाची ‘कोंडी’ फुटणार, शरद पवार आणि CM उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नऊ दिवस झाले. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप खाते वाटप झालेले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज चर्चा झाली. मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये झालेल्या या चर्चेला राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अजित पवार तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे उपस्थित हेते.

या बैठकिमध्ये खातेवाटपावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती दिली जातेय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेतली. परंतु त्यांना खाते वाटप झाले नाही. मात्र त्यांना बंगल्यांचे आणि मंत्रालयातील कक्षांचे वाटप झालं. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

खातेवाटपामध्ये काही महत्त्वाच्या खात्यांबाबत निर्णय होत नसल्याने खातेवाटप अडलं अशी माहिती मिळत आहे. मात्र, आता लवकरच मार्ग निघेल आणि खातेवाटप जाहीर होईल अशीही माहिती मिळत आहे. आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Visit : Policenama.com