Mumbai News | नारायण राणे, कृपाशंकर सिंह, विजयकुमार गावित, पाचपुतेंच्या चौकशीचं काय झालं? NCP कार्यकर्त्यांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) मंत्री आणि नेत्यांच्या विरोधात केंद्र सरकारने सूडबुद्धीने ईडीचा (ED) वापर केला असल्याची राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) या तीन पक्षांची भावना आहे. सुडाच्या या राजकारणात तीनही पक्षांनी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. खास करुन शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला (BJP) सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील (Mumbai News) ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. मुंबईतील (Mumbai News) ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ncp youth congress) कार्यकर्त्यांनी मुंबईतील (Mumbai News) ईडीच्या कार्यालयाबाहेर (ED Office) जोरदार निदर्शनं (protest) केली. तसेच, भाजप व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. ईडीचं कार्यालय हे भाजपचं कार्यालय झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. सरकार हमसे डरती है… ईडी को आगे करती है… अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच वेगवेगळ्या घोषणा लिहिलेले पोस्टर त्यांच्या हातात (Mumbai News) होते.

 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आघाडीच्या नेत्यांविरोधात रोजच्या रोज आरोप करत आहेत. सोमय्या यांच्या विरोधातील संतापालाही कार्यकर्त्यांनी यावेळी वाट मोकळी करुन दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी सोमय्यांवर शेलक्या शब्दांत टीका केली. किरीट सोमय्या हे भाजपचे दलाल आहेत. याच सोमय्यांनी पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये असलेल्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे आरोप केले होते. आज ते नेते भाजपमध्ये आहेत. मग त्यांच्या विरोधातील तक्रारीचं काय झालं? भाजपमध्ये गेल्यानंतर चौकशी थांबते का? सोमय्यांनी ह्याची माहिती जनतेला द्यावी, असा संतप्त सवाल चव्हाण यांनी केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या (Narayan Rane) चौकशीचं काय झालं? कृपाशंकर सिंहांच्या (Kripashankar Singh) चौकशीचं काय झाल? विजयकुमार गावितांच्या (Vijaykumar Gavit) चौकशीचं काय झाल? बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या चौकशीचं काय झालं? किरीट सोमय्या जवाब दो, अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

Web Title :- Mumbai News | ncp youth congress workers protest against bjp in front of ed office in mumbai ask about narayan rane, vijaykumar gavit, krupashankar singh and babanrao pachpute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money Laundering Case | ईडीच्या चौकशीला अनिल देशमुखांची गैरहजेरी, शोधासाठी तपास यंत्रणा झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! फी भरण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नवर्‍यानं बायकोला चक्क विहिरीत ढकललं, पण…

Pune Crime | पती घरी नसताना विवाहित बहिणीसोबत भावानं केलं ‘भलत’चं कृत्य, नंतर ‘ते’ व्हिडीओ नवर्‍याला दाखवण्याची दिली धमकी