Advt.

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बुधवारी (दि.10) रिलायन्स उद्योग समुहाच्या (Reliance Industries Group) हरकिसनदास सुपरस्पेशालिटी रुग्णालयात (Harkisandas Superspeciality Hospital) दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठीचा त्रास सुरु होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना मानेचा त्रास सुरु झाल्याने अखेर त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर मानेची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु असताना महत्त्वाची अपडेट आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 दरम्यान शस्त्रक्रिया होणार आहे. जेष्ठ अर्थो सर्जन डॉक्टर शेखर भोजराज (Dr. Shekhar Bhojraj) हे मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया (Neck surgery) करणार असल्याची माहिती समजतेय.

 

मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरु होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर (Cabinet meeting) ते रुग्णालयात दाखल झाले. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झाले. सुरुवातील घरीच उपचार करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | important update on the health of chief minister uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा