CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’

कोल्हापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   मागील दोन आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाने राज्यात जलमय वातावरण झालं आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) काही जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे पूरग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज (शुक्रवारी) कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा दौऱ्यावर आलेत. मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कोल्हापुरातील शाहुपुरीत पूरबाधितांशी सवांद साधला. घाबरू नका, काळजी करू नका, असा धीर मुख्यमंत्री यांनी पूरग्रस्तांना देत होते.

यांनतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी सवांद साधला आहे. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत.
संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली आणि परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू, असं उद्धव ठाकरे यांनी शाहुपुरीत पूरबाधितांना सांगितले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्याबाबत कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे.
हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे.
या संकटातून बाहेर पडताना कोरोना आणि पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणे, त्यांचं पुनर्वसन करणे यास आमचं प्राधान्य आहे.
हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जाताहेत.
तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
असे त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : CM Uddhav Thackeray | now tough decisions have be made otherwise crisis will not go away cm uddhav thackeray said kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील निर्बंधाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

Reliance Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लान, यामध्ये एक प्लान रिचार्ज केल्यास दोन प्लानचा मिळेल फायदा, जाणून घ्या डिटेल

Kolhapur News | कोल्हापूर दौऱ्यादरम्यान CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर, भेटीमागचं कारण समोर