CM Uddhav Thackeray | 14 तारखेला दुसरी बाजू लोकांसमोर आणणार, CM उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकतेच केंद्र सरकारने (Central Government) एलआयसीमधील (LIC) हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. एलआयसीमधील फक्त 5 टक्के हिश्श्याची विक्री केली जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. सध्या खासगीकरणाची (Privatization) खाज वाढू लागली आहे. कुठे कुठे खाजवणार आणि काय काय खासगी करणार याची कल्पना नाही, असा खोचक टोला लगावताना केंद्र सरकारने सुरु केलेल्या खासगीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी समाचार घेतला. तसेच 14 तारखेला दुसरी बाजू लोकांसमोर आणणार असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

 

भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या (Federation of Indian Insurance Employees Army) रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बोलत होते. ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ ही विमा क्षेत्रातील एलआयसीची जाहिरात आहे. तसाच माझा शिवसेनेबद्दल (Shivsena) सर्वांमध्ये विश्वास असायला हवा. ‘हर कदम हम आप के साथ है’ कितीही संकटे येऊ देत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जीवनातील प्रत्येक पावलावर ही आपली शिवसेना आपल्या सोबत आहे हा विश्वास देशभर पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.

भवीतव्यच अंधारात जात असेल तर…
एलआयसीचंही खासगीकरण सुरु झालं आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांचे भवितव्य काय ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली, दीप म्हटलं की उजेड पडतो. पण इकडे भवितव्यच अंधारात जात असेल, तर मग आपल्या संघटनेचं काम महत्त्वाचं असतं. जरी कुणी दुसऱ्या संघटनेचे असले तरी ते आपलेच आहेत म्हणून त्यांच्यासाठी न्याय हक्काची लढाई लढली गेलीच पाहिजे. ज्या – ज्या वेळी तुमच्यावर कोणी वार करेल, त्या – त्या वेळी त्या वाराचा मुकाबला करण्याची हिंमत आपल्या भगव्यात आहे, हे तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

14 तारखेला दुसरी बाजू आणणार
कोरोनानंतर हळूहळू कार्यक्रमांवर सुरुवात केली आहे. 14 तारखेला मी जाहीर सभा घेतोच आहे.
कारण किती दिवस हे नुसते ऐकत राहायचे.
एकदा काय ते सवाल – जबाब करु, एक दुसरी बाजू येऊ दे लोकांसमोर, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | privatization chief minister uddhav thackeray state government central government narendra modi lic shivsena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा