आगामी 10 वर्षात भारत बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुकेश अंबानींनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमेन मुकेश अंबानी यांंना देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लीडर ऑफ द डेकेड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले की त्यांना याची खात्री आहे की, या दशकात भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल.

मुकेश अंबानी म्हणाले, माझ्या जीवनात माझ्यासाठी सर्वात प्रतिष्ठित लीडर एकमेव आहेत, ते म्हणजे माझे वडील धीरुभाई अंबानी. त्यांनी मला मोठे स्वप्न पाहण्यास शिकवले. रिलायन्ससाठी आणि भारतासाठी मोठे स्वप्न पाहण्यास शिकवले. यामुळे मी हा पुरस्कार धीरुभाई अंबानी यांना समर्पित करतो आणि मागील दशकात कंपनीला बदलणाऱ्या युवा लीडर्सला.

आम्ही एका टेक्सटाइल कंपनीच्या रुपात सुरुवात केली होती, स्वत:ला एका पेट्रोकेमिकल्स कंपनीत बदलण्यापूर्वी, एका ऊर्जा कंपनीत बदलण्यापूर्वी आम्ही स्वत:ला टेलिकॉम आणि एका रिटेल दिग्गजमध्ये बदलले.

भारत सध्या जगातील सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था –
भारत सध्या जगातील सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था आहे. 2019 मध्ये भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला देखील मागे सोडले. अमेरिकेची संशोधन संस्था वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हूने आपल्या अहवालात म्हणले की, भारत आपली अर्थव्यवस्था खुली करत आहेत आणि स्वत:चा विकास करत आहे.

अहवालानुसार, जीडीपीनुसार भारत 2940 अरब डॉलरसह जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. यात भारताने 2019 मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला देखील मागे टाकले.