CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CNG Price Hike | मागील काही दिवसांपासून देशात महागाईचा भडका उडाला आहे. गॅस, इंधन दरवाढ यामुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. दरम्यान आणखी एक यामध्ये भर पडली आहे. दिल्लीत (Delhi) नैसर्गिक वायू म्हणजे सीएनजीच्या दरात (CNG Price Hike) वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (Indraprastha Company Limited) दिल्ली एनसीआर परिसरातील सीएनजीच्या किमतीत 2 रुपयांची वाढ केली आहे. रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. यामुळे आता देशाच्या अन्य भागातील सीएनजीच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

 

गेल्या काही दिवसाआधी घरगुती वापरासाठी जाणाऱ्या एलपीजी गॅसचा (LPG Gas) भाव वाढला होता. 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढले होते. 50 रुपयांची दरवाढ झाल्याने आता सिलेंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे. नवी दिल्लीत घरगुती गॅसचा दर 999 रुपये 50 पैसे इतका झाला होता. यानंतर आता दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने इतर भागाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (CNG Price Hike)

 

मुख्य शहरातील सीएनजीचे दर –

दिल्ली – 73.61 रुपये

नोएडा – 76.17 रुपये

गुरुग्राम – 81.94 रुपये

कानपूर – 85.40 रुपये

फतेहपूर – 83.88 रुपये

मुंबई – 76 रुपये

पुणे – 73 रुपये

नागपूर – 115 रुपये

 

Web Title :- CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा