अँम्बीशिअस काँम्पूटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातुन सामाजिक उपक्रमांचे आयोजन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन ( सुधाकर बोराटे ) – इंदापूर शहरातील श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी संचलित अँम्बीशिअस काँम्पूटर इन्टीट्युटच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षणाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमांच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध सामान्यज्ञान परिक्षांचे आयोजन करण्यात येते.

यामध्ये आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेवुन या परिक्षेत प्रथम, द्वितिय व तीसरा क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना टॅली हा संगणक कोर्स मोफत शिकविण्यात येत असतो. तसेत शालेय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्रिविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांनांही फीमध्ये सवलत देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असतो.

इदापूर शहरामध्ये अँम्बिशिअस काँम्पूटर प्रशिक्षण केंद्र हे संगणक क्षेत्रात सध्या आघाडीवर आहे.प्रा.प्रशांत बंगाळे सर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देण्यात येत असते.येथे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज असा संगणक लॅब असुन एका वेळी तीस प्रशिक्षणार्थीना बैठक व्यवस्था आहे.

तर स्वतंत्र लायब्ररी व स्वतंत्र क्लास रूमची व्यवस्था असल्याने शहर व परिसरातील अधिकाधीक विद्यार्थी हे अँम्बीशिअसमध्येच संगणक कोर्स करण्याच्या प्रयत्नात असतात.इंदापूर शहरात नावाजलेले व अग्रणी असलेले संगणक प्रशिक्षण केंद्र आहे.

गोरगरिब व होतकरू विद्यार्थी तसेच आर्थिक अडचणीत असणार्‍या विद्यार्थ्यांना कोर्स फीमध्ये सवल देण्यात येत असते. तर प्रत्येक वर्षी राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम यामुळे अँम्बीशिअस काँम्पूटर इन्टिट्युट हे इंदापूरातील नावाजलेले संगणक प्रशिक्षण केद्र म्हणून ओळखले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/