कर्जबाजारी आयएलएफएसवरून काँग्रेस व भाजपमध्ये पुन्हा जुंपली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सुमारे ९१ हजार कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेल्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्सिएल सर्व्हिसेसला (आयएलएफएस) वाचवण्यासाठी केंद्र सरकार पुढे आले आहे. ही कंपनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी सरकारने नॅशनल कंपनी लॉड ट्रब्यूनल (एनसीएलटी) याचिका दाखल केली होती. आयएलएफएस प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापुर्वीच संशय व्यक्त केला असून मोदी सरकारवर टीका केली होती. तर त्यांच्या टीकेला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43a2cf56-c5f6-11e8-9d46-07719c2104a9′]

४ सप्टेंबर रोजी आयएलएफएसला सिडबीचे ४ हजार कोटी रुपयांचे शॉट टर्म कर्ज न चुकवल्याने ही कंपनी अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, गैर बँकिंग आर्थिक कंपनीला रोकड समस्येतून बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या आयएलएफएस कंपनीला वाचवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.

मर्जितील पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या अटळ

राहुल गांधींनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांकडून शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लेसन्स फॉर राहुल गांधी फ्रॉम हिज पार्टीमन या शीर्षकाखाली फेसबुक पोस्ट लिहून जेटलींनी काँग्रेसला राष्ट्रीय विध्वंसक पक्ष अशी उपमा दिली आहे. आयएलएफएसला वाचवण्यासाठी काँग्रेसचे नेते के व्ही थॉमस यांनी काही उपाय सुचवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जेटलींनी राहुल गांधींवर टीका केली.

[amazon_link asins=’B00GX7AISS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58c7dcc6-c5f6-11e8-9cec-e3f9dda938a4′]