छत्तीसगडमध्ये काँग्रेसची गाडी सुसाट, भाजपाची पीछेहाट… 

रायपूर:वृत्तसंस्था राजस्थान ,छत्तीसगड,मध्यप्रदेश ,तेलंगणा आणि मिझोराममध्ये मतमोजणीला आज सकाळी ७ वाजल्यापासूनच सुरुवात झाली आहे . या पाचही राज्यांमधील छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आतापर्यंत काँगेसचे गाडी सुसाट आहे  तर मिझोराम मध्ये मिझो नॅशनल पक्षाची आघाडी आहे. तेलंगणा मध्ये तेलंगणा राष्ट्र समिती आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेश मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत  सुरु आहे.
आतापर्यंतची आकडेवारी 
काँग्रेस –६४
भाजप–१७
इतर –९
छत्तीसगडमध्ये असलेल्या नक्षलग्रस्त भागामुळे येथील निवडणूक महत्वाची मानली जाते . छत्तीसगडमध्ये हातीच आलेल्या निवडणुकांच्या निकालानुसार येथे भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधल्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस ६४जागांवर पुढे असून, भाजपा काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजपा १७ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. अजित जोगी आणि मायावतींची आघाडी दोन जागांवर पुढे असून, अजित जोगींनाही जनतेनं सपशेल नाकारलं आहे.
भाजपचे चावलवालेबाबा  रामनसिंग पराभवाच्या छायेत 
छत्तीसगडमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपाच्या रमण सिंह यांचं सरकार आहे. रमण सिंह यांनी सत्ता काळात गोरगरिबांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जनमानसांत त्यांची चावलवालेबाबा अशीही प्रतिमा तयार झाली होती. परंतु त्यांच्या या प्रतिमेचा भाजपाला फायदा झाला नाही. तसेच त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये आदिवासींसाठी अनेक योजना पोहोचवल्या होत्या. परंतु तरीसुद्धा भाजपाला जनतेनं झिडकारलं आहे. रमण  सिंग पराभवाच्या छायेत आहेत.
काँग्रेसला भरभरून साथ 
एकीकडे अजित जोगींनी काँग्रेसची साथ सोडून मांडलेली वेगळी चूल आणि मायावतींशी केलेली आघाडी यामुळे काँग्रेसच्या मतांचं धुव्रीकरण होण्याची शक्यता होती. पण अजित जोगी जाऊनही याचा काँग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही.उलट काँग्रेसला जनतेनं भरभरून मतं दिली आहेत. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री रमण सिंह यांना राजनांदगाव या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शुक्ला हे कडवी झुंज देत असतानाही राज्यात भाजपाची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसनं  ६४ जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे.