राजीव गांधींना होतं प्रचंड ‘बहुमत’, पण कधीही दहशत पसरवली नाही : सोनिया गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. गांधी म्हणाल्या, राजीव गांधींना सुद्धा पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु त्यांनी कधीही भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी याचा वापर केला नाही.

त्या म्हणाल्या कि, राजीवजींच्या आठवणी आजही आमच्या मनात आहेत. त्यांनी भारताला मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी काम केले. राजीव गांधी यांनी अल्पावधीतच भारताची एकात्मकता वाढीस लागण्याच्या दिशेने आणि देशाची एकंदरीत परिस्थिती बदलण्याचे काम करून दाखवले आहे. देशातील १८ वर्षांच्या तरुणांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे हा त्यांचाच निर्णय होता. तसेच पंचायत आणि नगरपालिकांना वैधानिक दर्जा मिळवून देण्याचा निर्णय असेल ज्यामुळे पंचायतराज व्यवस्था लोकशाहीची पहिली पायरी म्हणून उदयास आली.

राजीवजींनी, दूरसंचार क्रांती करण्याचा संकल्प केला आणि अल्पावधीतच तो पूर्णत्वास नेला. अणुऊर्जा, अंतराळ आणि क्षेपणास्त्रांच्या निर्माणासाठी तंत्रज्ञान वापरणे सीमित न राहता तंत्रज्ञानाची खरी ताकत सामाजिक परिवर्तनाची गती वाढविण्यासाठी, देशाच्या विकासासाठी केली. तसेच त्यांनी पिण्याचे पाणी व कृषी क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.

गर्व नाही काम करून दाखवलं
राजीव गांधींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला विश्वव्यापी करण्यासाठी सर्वप्रथम पाऊल उचलले. ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे हित बाजूला ठेवून येथील परिस्थिती सामान्य होण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांना हे देखील ठाऊक असले पाहिजे की जर जागतिक पातळीवर भारताला विशेष दर्जा प्राप्त करायचा असेल तर भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल. असे काम केवळ बडेजावपणा आणून आणि घोषणाबाजी करून करता येणार नाही तर प्रत्यक्ष काम करण्यानेच साध्य झाले.

सन १९८४ साली राजीव गांधी मोठ्या बहुमताने विजयी झाले होते. पण त्यांनी घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. तसेच मतभेद चिरडण्यासाठी वापर केला नाही, लोकशाही परंपरा आणि जीवनशैलीला धोका निर्माण करण्यासाठी वापर केला नाही.

काँग्रेस पक्ष प्रवक्ते म्हणाले कि, १९८९ साली काँग्रेस पुन्हा बहुमताने निवडून आले नाही. राजीवजींनी हि हार स्वीकारली. कॉंग्रेस सर्वात मोठा राजकीय पक्ष असूनही, राजीव यांनी सरकार स्थापनेचा दावा केला नाही. हे त्यांचे नैतिक सामर्थ्य, त्यांच्या अंगी असलेला उदारपणा आणि प्रामाणिकपणा याचे उदाहरण होते. सोनिया पुढे म्हणाल्या कि, हे आज कोणीही करू शकतं, जसे पूर्वी राजीव आणि आता राहुल यांनी केलं.

आरोग्यविषयक वृत्त –