Congress Leader Ashok Chavan | मविआच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले, बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी नाही, फार्म्युला…

नांदेड : Congress Leader Ashok Chavan | कोणत्या जागा सोयीच्या आहेत? राजकीय परिस्थिती काय? समीकरणे काय? या सर्व बाबींचा विचार पक्षश्रेष्ठींना निर्णय घेण्यापूर्वी करावा लागतो. मात्र जागा वाटपात बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी व्हायची आहे. जागा वाटपाचा कोणताही फार्म्युला अद्याप ठरलेला नाही. पक्षश्रेष्ठी निर्देश देईपर्यंत आम्हाला थांबावे लागणार आहे, असे जागावाटपाबाबत स्पष्टीकरण काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी (Congress Leader Ashok Chavan) केले. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मित्रपक्ष करत असलेल्या जागेच्या मागण्यांबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची २३ जागांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांची १२ ते १३ जागांची इच्छा, शरद पवारांची सुद्धा काही इच्छा असेल तसेच काँग्रेसचीही इच्छा आहे. परंतु या सर्व इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या पुढे जाईल. त्यामुळे सर्व हिशोब ४८च्या आत बसवावा लागेल. तो बसविण्यासाठी जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे? कोण निवडून येऊ शकतो ही समीकरणे महत्वाची आहेत. (Congress Leader Ashok Chavan)

अशोक चव्हाण म्हणाले, दिल्लीत मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेतील जागांबाबत चर्चा झाली. या चर्चेसाठी महाराष्ट्रातून आम्ही चार-पाच नेते होते. यावेळी पक्षश्रेष्ठींनी जागा लढविण्याबाबत विचारपूस केली. कुठे काय परिस्थिती आहे? याची माहिती घेतली. शेवटी ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढे जायचे आहे.