काँग्रेसच्या ‘या’ बडया नेत्याने केला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अध्यक्ष पदासाठी योग्य नेत्याची शोधाशोध काँग्रेसकडून सुरु आहे. अशातच मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी काँग्रेस अध्यक्षपदावर दावा केला आहे. आपल्याला काँग्रेसचे अध्यक्ष होण्यास आवडेल असे पत्र त्यांनी राहुल गांधी यांना लिहले आहे.

अस्लम शेरखान हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. शेरखान यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दावा केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून आपण काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी अध्यपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अध्यपदासाठी योग्य नेत्याचा शोध घेण्यास सांगतले आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडू नये यासाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना विनंती केली. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

अस्लम शेरखान यांनी काही वर्षे केंद्रीय मंत्री होते. राहुल गांधी यांनीच अध्यक्ष पदावर राहावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगत त्यांची इच्छा नसले तर त्याच्या इच्छेचे आदर केला पाहिजे. अन्य कोणी नेते हे पद सांभाळण्यासाठी पुढे येत नसतील तर मी हे पद सांभाळण्यासाठी तयार आहे, असे पत्र अस्लम यांनी राहुल गांधी यांना पाठवले आहे.