गणेश विटकर यांची पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस पदी निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने काल कॉंग्रेस भवन येथे ‘स्नेहमेळावा’ उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे, पुणे शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे अनुसूचित जाती उपाध्यक्ष भुजंग लव्हे, राजाराम बलाळ, पुणे शहर कॉग्रेस सरचिटणीस राहुल तायडे, जेष्ट नेते द. स. पोळेकर, ब्लॉकअध्यक्ष रमेश सकट, रमेश सोनकांबळे, ओबीसीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सुरसे, बाबा नायडू, हेमत राजभोज, अमोल वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती अध्यक्ष शिलार रतनगिरी यांनी कार्यकारणी जाहीर केली. यावेळी युवा कार्यकर्ते गणेश रामदास विटकर यांची पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

यावेळी गणेश रामदास विटकर म्हणाले की, ‘माझी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. पुणे शहर जिल्हा अध्यक्ष शिलार रतनगिरी यांनी पुणे शहराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, ही जबाबदारी मी योग्य रितीने पार पाडून दाखवेन. त्याबद्दल मी रमेश बागवे व विजय अंभोरे व सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो. ‘

या स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केले. त्याचबरोबर पुणे शहर कॉग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कार्यअध्यक्ष लतेंद्र भिंगारे यांनी सर्वांचे आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा –