लष्कर प्रमुखांवर भडकले पी. चिदंबरम, म्हणाले – ‘तुम्ही तुमचं काम सांभाळा, राजकारण आम्हाला करू द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेता पी चिदंबरम यांनी देशाच्या लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना सुनावताना सांगितले की त्यांनी नेत्यांना सल्ला देऊ नये. ते लष्कर प्रमुख आहेत आणि त्यांनी त्याचे काम केले पाहिजे. तिरुवनंतपुरममध्ये काँग्रेसच्या स्थापना दिवस साजरा करण्यात आला, तेव्हा चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला. चिदंबरम म्हणाले की डीजीपी आणि लष्कर प्रमुखांना सरकारला समर्थन देण्यासाठी सांगितले जात आहे, हे निंदनीय आहे.

कामाशी काम ठेवा –
चिदंमबरम म्हणाले की, डीजीपी, लष्कर प्रमुखांना सरकारचे समर्थन करण्यास सांगितले जात आहे, हे निंदनीय आहे. मी जनरल रावत यांनी आवाहन करतो की तुम्ही सैन्याचे प्रमुख आहात आणि तुम्ही तुमचे काम केले पाहिजे. जे नेत्यांना करायचे आहे की नेते करतील. हे लष्कर प्रमुखांचे काम नाही की त्यांनी नेत्यांना सांगावे की नेत्यांनी काय करावे. जसे की हे आमचे काम नाही की आम्ही त्यांना सांगावे की युद्ध कसे लढले जावे. जर तुम्ही एखादे युद्ध लढत असाल तर आम्ही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही अशा प्रकारे युद्ध लढा. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने युद्ध लढतात. देशात राजकारण आम्ही चालवू.


बिपीन रावत म्हणाले की नेता नेतृत्व देणारा असतो, लोकांना चूकीच्या दिशेने घेऊन जाणारा नसतो. देशभरात नागरिकत्व संशोधन बिलासंबंधित होत असलेल्या आंदोलनावर बिपीन रावत यांनी वक्तव्य केले की नेता ते नाहीत जे लोकांना चूकीच्या दिशेने घेऊन जातील, जसे की आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने विद्यपीठ आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नेले जाते आहे, जेथे नंतर हिंसा झाली, नेतृत्व नव्हते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/