माजी मुख्यमंत्री राज्यातील नेत्यांच्या कार्यपध्दतीवर ‘नाराज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, यामुळे काँग्रेस पक्षामधील अंतर्गत वाद आता समोर येण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता ही नाराजी व्यक्त केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक का झाली माहिती नाही पण कृषी कायदा दुरूस्तीची भूमिका आमची होती. पण काहीच झाले नाही. वास्तविक याबाबत निर्णय होणे गरजेचे होते असे ते म्हणाले. तसेच चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षा यावर पहिले तीन प्रश्न आहेत. ते पहिला घ्यावे बाकी मग अन्य विषयावर नंतर घेता येईल’ असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट –
हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना त्वरित गुजरात काँग्रेस कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देखील देण्यात आली मागील काही दिवसांपासून हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांची चाचपणी करत आहे की काय अशी एक शक्यता देखील वर्तवली जात आहे. या संदर्भात ही भेट होती, असे म्हटलं जात आहे.