शशी थरूर यांनी केजरीवालांवर केला ‘किन्नर’ शब्दाचा वापर, ब्रिटीश म्हणी सांगत मागितली ‘माफी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय भूकंप होणे सुरु झाले आहेत. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या घमासान युद्ध चालू आहे. जो तो नेता आपली बाजू मांडून समोरच्याला कमी लेखण्यात व्यस्त आहेत. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी किन्नर (Eunuch) शब्दाचा वापर केला आहे. थरूर म्हणाले की अरविंद केजरीवाल यांना जबाबदारीशिवाय सत्ता हवी आहे आणि शतकानुशतके किन्नर हे करत आले आहेत. शशी थरूर यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर त्यांना जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर त्यांनी संदर्भ देऊन माफी मागितली आहे.

CAA वरील चर्चेदरम्यान केले विधान
शशी थरूर एका टीव्ही कार्यक्रमात उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, केजरीवाल यांना सीएए समर्थक आणि विरोधक दोघांनाही आपल्याकडे वळवायचे आहे. ते म्हणाले की केजरीवाल हे केंद्र सरकारच्या नागरिकत्वाच्या धोरणालाही विरोध करीत आहेत, परंतु त्या विरोधात कोणतेही कठोर पावले उचलत नाहीत. सोमवारी सोनिया गांधी यांनी सीएएविरोधात विरोधी पक्षांची मोठी बैठक बोलावली होती, या बैठकीत आपचे कुणीच उपस्थित नव्हते.

‘हा शतकानुशतके किन्नरांचा विशेषाधिकार राहिलेला आहे’
शशी थरूर म्हणाले, “त्यांनी सामान्य मानवी सहानुभूती देखील दाखविली नाही, जी की हिंसाचाराला बळी पडलेली लोक राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे करतात”. तेव्हा ते म्हणाले, केजरीवाल यांना जबाबदारी न स्विकारता सत्ता हवी असते, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की शतकानुशतकांपासून हा किन्नरांचा विशेषाधिकार राहिलेला आहे, आणि अशा अप्रभावी भूमिकेमुळे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे स्थान सुरक्षित ठेवेल… माझे म्हणणे आहे की आपण आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द हा प्रयत्न करत संपवू शकता की आपण शत्रू बनवू नये, परंतु शेवटी आपण कोणत्या गोष्टीसाठी उभे असतो?”

काँग्रेस खासदाराच्या या विधानामुळे ट्विटरवर त्यांना लोकांनी धारेवर धरत टीका केली आहे. त्यानंतर काही तासांनीच शशी थरूर यांनी आपल्या विधानाची माफी मागितली. थरूर यांनी आपल्या विधानाला समजावत सांगितले की, मी अशा लोकांची माफी मागतो ज्यांनी ‘कोणतीही जबाबदारी न स्वीकारता सत्ता’ या विधानाला आक्षेपार्ह मानले. हे ब्रिटिश राजवटीतून घेण्यात आलेले एक जुने वाक्य आहे, ज्याचा संबंध किपलिंग आणि पंतप्रधान स्टॅन्ली बाल्डविनशी येतो. नुकतेच टॉम स्टॉपर्डने देखील याचा वापर केला होता. मला समजत आहे की आता याचा वापर करणे हे चुकीचे होते, मी त्या विधानास परत घेतो.”

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like