Congress Mohan Joshi On Modi Govt | सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारलाचा आणखी एक चपराक – प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Congress Mohan Joshi On Modi Govt | काँग्रेसचे नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात न्यायालयाने (Gujarat Court) दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली. मणीपूर हिंसाचाराकडे (Manipur Violence) दुर्लक्ष करत असल्याबद्दल केंद्र सरकारला सुनावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही आणखीएक चपराक केंद्र सरकारला, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला (BJP) लगावली आहे. (Congress Mohan Joshi On Modi Govt ) विरोधी पक्ष संपवण्याच भाजपचा कुटील डाव या स्थगितीने धुळीस मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Mohan Joshi) यांनी व्यक्त केली.

भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देशात विविधतेत एकता असे वातावरण निर्माण केलेले
राहूल जी गांधी यांची भाजपला भीती वाटत होती. त्यामुळेच दुसर्‍या
राज्यात राहूल यांनी केलेल्या एका भाषणाचे खोटे निमित्त करून गुजरातमध्ये
खटला दाखल करण्याचे कारस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमीत शाह यांनी रचले.
मात्र देशातील सर्वोच्च न्यायालयाने हे कारस्थान हाणून पाडले आहे असे जोशी म्हणाले.

आता ८,९ व १० ऑगस्ट या दिवशी संसदेत होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या चर्चेसाठी देखील
राहूल गांधी सहभागी होऊ शकतील ही देशातील जनतेच्या दृस्ठीने ही
उत्साहाची बाब आहे असे जोशी यांंनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल

Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरातील दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 35 वी स्थानबध्दतेची कारवाई