Congress On GST | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Congress On GST | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या आनंदात देशातील जनता असताना केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने (Modi Government) जनतेच्या रोजच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंवर नवा ५% GST लावून भाजपचे मोदी सरकार जनता विरोधी आहे हे पुन्हा सिद्ध केले आहे. (Congress On GST)

 

गहू, गव्हाचा आटा, तांदूळ, पोहे, मुरमुरे, ज्वारी, बाजरी, गुळ, दही, पनीर अशा असंख्य जीवनावश्यक वस्तूंवर नवा ५% जीएसटी लावत असताना आता किमान जनतेच्या श्वसावर तरी भाजपच्या मोदी सरकारने जीएसटी लावू नये अशी उपरोधिक प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former Congress MLA Mohan Joshi) यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (Congress On GST)

 

या संदर्भात मोहन जोशी यांनी सांगितले की केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश आले असून नोटाबंदी,
जीएसटीची घाईने चुकीची अंमलबजावणी याबरोबरच मोठ्या मुठभर उद्योगपतींना धार्जिणे आर्थिक धोरण यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
प्रचंड महागाई व बेकारी जनता भोगत आहे.
जनतेच्या श्वासावर जीएसटी लावणे एवढेच आता बाकी राहिले आहे असे मोहन जोशी यांनी म्हंटले.

 

 

Web Title :- Congress On GST | PM Narendra Modi ji at least dont impose GST on peoples breath Mohan Joshi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा