Pune Crime | घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये घरफोडी (Burglary), वाहन चोरी (Vehicle Theft) आणि फसवणुक (Fraud) करणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी पुणे शहरातील (Pune Crime) वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी (Pune Police) तीन आरोपींना अटक केली आहे.

 

नवी खडकी येथे राहणारे एक जेष्ठ नागरिक शनिवारी (दि.15) भवानी पेठेतील बक्कर कसाब मशिद समोर उभे राहून हज यात्रेसाठी (Hajj Yatra) जाण्यासाठी मदत गोळा करत होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मजिदसाठी चंदा देयचा असल्याचे सांगून तुमच्याकडे किती पैसे आहेत पैसे दुप्पट करुन देतो असे आमिष दाखवले. जेष्ठ नागरिकाकडून 19 हजार रुपये घेऊन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरुन निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जेष्ठ नागरिकाने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) दाखल फिर्याद दिली. (Pune Crime)

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी अब्दुला कादीर शेख Abdul Kadir Shaikh (वय-36 रा. कोंढवा खुर्द) याला अटक करुन समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले.

चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi Police Station) दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात रोहित दिपक सातपुते Rohit Deepak Satpute (वय-25 रा. हडपसर) याला अटक (Arrest) केली. आरोपी रोहीत सातपुते याला शिवाजी रोडवर सापळा रचून अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दिवसा घरफोडी चोरीचे 15 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

दरम्यान, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीतील संतोष नगर कात्रज परिसरातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा दुचाकी जप्त केली. आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), अजय जाधव (PSI Ajay Jadhav),
पोलीस अंमलदार महेश बामगुडे, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, अनिकेत बाबर, दत्ता सोनवणे, अभिनव लडकत यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch arrests criminals who commit burglary and vehicle theft

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | रंग कामातील तोटा भरुन काढण्यासाठी केल्या जबरी चोऱ्या; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या, 7 गुन्हे उघडकीस

 

Jammu Kashmir Grenade Blast | जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ ग्रेनेड स्फोटात 2 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

 

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती, कोंढव्यात गुन्हा दाखल