काँग्रेसने मोदी सरकारला लगावला सणसणीत टोला, म्हणाले – ‘हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवल असतं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील हरीद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीमुळे हजारो भाविकांसह, साधू-संताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यानंतर कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान मोदीनी संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. वाढत्या कोरोनामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या आवाहनानंतर काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. …हेच जर दुसरे कोणी केले असते तर त्याना हिंदूद्रोही ठरवले असते असे म्हणत निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. बरे झाले पंतप्रधान मोदीनी कुंभमेळा समाप्त करण्याचे आवाहन केले. हेच जर दुसरं कोणी केले असते. तर त्याला हिंदूद्रोही ठरवलं असते. कालपर्यंत 49 लाख लोकांनी स्नान केले आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा किती कोरोना घेऊन कुठपर्यंत जाईल हे माहिती नसल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. निरुपम यांनी कुंभमेळा तत्काळ समाप्त करावा असे आवाहन देखील स्वामी अवधेशानंद गिरी यांना केले आहे. पंतप्रधान मोदी याबाबत म्हणाले की, मी आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सर्व संतांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मी संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील 2 शाही स्नान पूर्ण झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळेल. कुंभमेळ्याची समाप्ती 27 एप्रिललला होणार आहे. वाढत्या कोरोनामुळे कुंभमेळा वेळेआधीच समाप्त केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कुंभमेळा वेळेपूर्वीच संपवण्याची कुठलीही योजना नसल्याचे उत्तराखंड सरकारने स्पष्ट केल्याने आता कुंभमेळा नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होईल हे स्पष्ट झाले आहे.