‘पाकिस्तानी नागरिकांना भारताचं ‘नागरिकत्व’ देऊ, असं तरी काँग्रेसनं जाहीर करावं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून तीव्र वाद सुरु आहे आणि देशात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. विशेषतः नॉर्थ इस्टच्या राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध मोठमोठी आंदोलन पुकारण्यात आली आहेत. या आंदोलनाची धग देशभरात जाणवत असून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला असून महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका राहिलेली आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता काँग्रेसला धारेवर धरत काँग्रेससह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याऱ्या सर्वांना टोला लगावलाय. तसेच, भाजपाने काँग्रेसला आव्हान देखील दिले आहे.

झारखंड मधील बरहैत येथील सभेत नरेंद्र मादी बोलत होते. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणातून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यावर निशाणा साधला. तसेच आर्टीकल ३७० वर त्यांनी भाष्य केले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि म्हणाले की आर्टीकल ३७० च्या वेळेसही काँग्रेसने असाच गोंधळ घातला होता. आर्टीकल ३७० काढले तर करंट बसेल, वातावरण चिघळेल, असा संभ्रम निर्माण केला होता. मात्र तसे काहीही न होता ३७० हटविल्यानंतरही जम्मू काश्मीर मध्ये शांतता आहे. त्यामुळे हे फक्त आपलं राजकारण करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे हिंदु-मुस्लीम-शिख-ईसाई तसेच देशातील एकाही नागरिकाच्या नागरिकत्वास धोका होणार नाही, असे मोदींनी सांगितले. तसेच त्यांनी काँग्रेस ला आव्हान दिले आहे की, ‘हिंमत असेल तर पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा काँग्रेसने करावी.’

तसेच मोदी म्हणाले की जर काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आर्टीकल ३७० लागू करा. तीन तलाकविरुद्ध जो कायदा बनलाय, तो रद्द करणार, असं काँग्रेसने जाहीरपणे सांगावं. विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये असे मोदींनी आपल्या झारखंडमधील भाषणात म्हटले. नागरिकत्व सुधारणा कायदा हा बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधून धार्मिक अत्याचारासाठी आपल्या देशात येणाऱ्या लोकांसाठी बनवला असल्याचे मोदींनी सांगितले. त्यामुळे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशातील शांतता भंग करू नका असे सांगून मोदींनी या कायद्याविरोधात जाणाऱ्या सर्वांना लक्ष करत मोदींनी या कायद्याचे महत्व पटवून दिले. तसेच देशात होणारे आंदोलनाला काँग्रेस पक्षाकडून खतपाणी घातले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/