Contract Police In Mumbai | कंत्राटी पोलीस भरतीवर रोहित पवार संतापले, म्हणाले – ‘कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर… ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Contract Police In Mumbai | मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने (Home Department) घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फेत (State Security Corporation) कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी ही भरती (Contract Police In Mumbai) केली जाणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या (Mumbai Police CP) विनंतीवरुन गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. गृह विभागाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी एका वृत्तपत्राचे कात्रण ट्विट करत गृह विभागाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले, राजकारणात पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरु करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण (Maharashtra Politics) भाजपाने (BJP) मलीन केलं, त्याप्रमाणेच कंत्राटी पोलिस भरती (Contract Police In Mumbai) करुन आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते. लाखो युवा पोलिस भरतीसाठी ( Maharashtra Police Recruitment) प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करुन कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध!, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे मनुष्यबळाची गरज आहे.
दहीहंडी (Dahihandi), गणेशोत्सव (Ganesh Festival), नवरात्रोत्सव (Navratri Festival), रमजान (Ramzan),
दिवाळी (Diwali) अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते.
त्यामुळे मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा आग्रह पोलीस आयुक्तांचा होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई पोलस दलासाठी शिपाई ते सहायक पोलीस निरीक्षक (API) यांची 40 हजार 623 पदे मंजूर करण्यात आली आहेत.
त्यापैकी 10 हजार पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.
राज्य सरकारने (State Government) 21 जानेवारी 2021 रोजी 7 हजार 076 शिपाई आणि 994 वाहनचालकांच्या
भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ पोलीस दलात
दाखल होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने पोलिसांची 11 महिन्यांसाठी नियुक्ती
केली जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune: Ajit Pawar’s Staunch Supporter Baburao Chandere Beat-up a Rickshaw Driver, Video Goes Viral

Amitabh Bachchan | ‘झुमका गिरा रे’ या गाण्यांचा रिमेक असणाऱ्या ‘व्हाट झुमका’ गाण्यांशी अमिताभ बच्चन यांचा आहे निकटचा संबंध