Contract Tehsildar Recruitment Advertisement | कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात अखेर रद्द, महसूलमंत्र्यांचा मोठा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी शासनाकडून कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंदर्भात जाहिरात (Contract Tehsildar Recruitment Advertisement) प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीवरुन राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. या जाहिरातीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तकर दुसरीकडे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर राज्य सरकारने (State Government) याची गंभीर दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे. (Contract Tehsildar Recruitment Advertisement)

कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) यांना दिले आहेत. तसेच कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची पदं भरण्याचं शासनाचं कोणतही धोरण नाही, असा खुलासा विखे पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले विखे पाटील?

कंत्राटी तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात (Contract Tehsildar Recruitment Advertisement) तात्काळ रद्द करा असे आदेश राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यासंदर्भात खुलासा करताना विखे पाटील म्हणाले, कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची पदं भरण्याचा सरकारचे कोणतेही धोरण नाही.
जळगाव जिल्ह्यात भुसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज होती.
म्हणून ती जाहीरात काढली होती, शासनाची ही पुर्वपद्धत आहे.
मात्र, या नियुक्तीची जाहिरात काढली गेल्याने आता कंत्राटी पद्धतीनेच तहसीलदार भरती होणार,
असा गैरसमज निर्माण झाला, असेही विखे पाटील यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 45 वी स्थानबध्दतेची कारवाई