Cops Suspended | पोलीस ठाण्यातच ओली पार्टी अन् गुटखा विक्री, 6 पोलीस निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Cops Suspended | गुटखा विक्री तसेच पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत त्यांच्या केबिनमध्ये ओली पार्टी करणं पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलच महागात पडलं आहे. पोलिसांच्या या गैरकृत्याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांनी (DCP) सहा पोलिसांना निलंबित (Cops Suspended) केले आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशी अंती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ही कारवाई केली आहे. सशस्त्र पोलीस दलातील दोन पोलिसांसह भांडुप पोलीस ठाण्यातील (Bhandup Police Station) चौघांचा यामध्ये समावेश आहे.

भांडुप पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) हे 25 ऑक्टोबर रोजी त्यांच्या दालनात हजर नसताना तेथे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील कंक (ASI Sunil Kank), कॉन्स्टेबल शैलेश पाटोळे (Constable Shailesh Patole), मनोहर शिंदे (Manohar Shinde) हे ओली पार्टी करत बसले होते. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भांडुप विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (Bhandup Division ACP) यांनी तपास करुन अहवाल सादर केला होता. या कारवाई पाठोपाठ पोलीस पाटी लावून गुटखा विक्री करणाऱ्या मोसीम शरीफ शेख (Mosim Sharif Shaikh) याच्यावरही निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे. (Cops Suspended)

मोसीम शेख हे सशस्त्र पोलीस दलात कार्य़रत आहेत. त्यांच्याविरुद्ध पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात (Kasa Police Station) दोन लाख 84 हजार रुपयांच्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करुन त्याला अटक केली होती. नायगाव येथील पोलीस शिपाई बाळू रामकृष्ण ढाणे (Balu Ramakrishna Dhane) यांच्याविरुद्ध मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पार्टी सुरु असताना पोलीस निरीक्षकांचे मदतनीस प्रेमचंद सावंत (Premchand Sawant)
यांनी देखील या तिघांना अडवले नाही. तसेच वरिष्ठांना यासंदर्भात कळवले नाही.
त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. अखेर, विभागीय चौकशीअंती प्रेमचंद सावंत
यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. चौघांनाही याबाबतचे आदेश पाठवले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benzer Paints | बेंझर पेंट्स आता एका नव्या रंगरूपात

जुन्या भांडणाच्या रागातून दुचाकी पेटवली, चाकण मधील प्रकार; एकाला अटक