Corona Cases in Pune | दिलासादायक ! पुण्यात उपचाराधीन रुग्णसंख्येत प्रचंड घट; शहरात 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोनाच्या संसर्गाने (Corona Cases in Pune) मागील दीड वर्षांपासून भारताची अवस्था बिकट झाली आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसऱ्या लाटेने (second wave) तर आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडले. सुविधांच्या कमतरतेमुळे अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना डोळ्यादेखत जीव (deaths) सोडताना पाहिलं होतं. या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग सर्वाधिक होता त्यामुळे बाधितांची संख्यादेखील वाढत जात होती. पुण्यात तर 54 हजारांच्या पार कोरोना बाधितांचा (Corona Cases in Pune) आकडा जाऊन उच्चांक गाठला होता. मात्र आता या संख्येत प्रचंड घट झाली आहे.

corona cases in pune | number of patients undergoing treatment in pune decreased reached 9 month low

पुण्यातील दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या लक्षात घेता गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या सध्या पाहायला मिळत आहे. शहरात फक्त 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 नोव्हेंबर 2020 रोजी हा आकडा 880 इतका होता. उपचाराधीन रुग्णांची संख्या (patients undergoing treatment) कमी झाल्यानं पुण्यातील आरोग्य व्यवस्थेवरील बराच ताण कमी झाला आहे. पुणे शहर (Pune City) सावरत असल्याचं हे चित्र आहे. सध्या सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजारांच्या आसपास आहे. पण यातील 1 हजार 726 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे त्यांना घरीच विलगीकरणात (Home quarantine) ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर अन्य 916 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

10 टक्के लोकांना कोरोनाची लागण

पुणे शहराची लोकसंख्या 45 लाख असून आतापर्यंत एकूण 4 लाख 85 हजार 855 जणांना कोरोना
विषाणूची लागण झाली आहे. म्हणजे 10 टक्क्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली
आहे. यातील 4 लाख 74 हजार 477 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर पुण्यात
आतापर्यंत 8 हजार 736 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्च 2020 रोजी आढळला होता.

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक, 2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Khadakwasla Dam | खडकवासला धरणात 4 दिवसांत तब्बल तीन महिन्यांचा पाणीसाठा; जाणून घ्या प. महाराष्ट्रातील ‘या’ 28 धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (TMC मध्ये)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  corona cases in pune | number of patients undergoing treatment in pune decreased reached 9 month low

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update