Corona | पुण्यात सुरू झाली कोवोव्हॅक्सच्या फेज 2/3 ची ट्रायल, सहभागी होतील 7-11 वर्षाची मुले

पुणे : कोरोना व्हायरस (Corona virus) च्या विरूद्ध लढाईत आतापर्यंत व्हॅक्सीनपासून वंचित असलेल्या मुलांसाठी लवकरच चांगली बातमी मिळू शकते. पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज (Bharati Vidyapeeth Medical College Hospital, pune) मध्ये बुधवारी कोवोव्हॅक्स (Covovax) व्हॅक्सीनच्या फेज 2/3 ची ट्रायल सुरू झाली आहे. (Corona)

सध्या, ही चाचणी 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर केली जात आहे. तिकडे, दिल्लीत सुद्धा हमदर्द वैद्यकीय शास्त्र आणि संशोधन संस्थेत कोवोव्हॅक्सच्या दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी स्वयंसेवक भरती सुरू झाली आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवानी यांनी सांगितले, पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने बुधवारी 7 आणि 11 वर्ष वयाच्या मुलांमध्ये कोवोव्हॅक्सच्या 2/3 टप्प्याची चाचणी सुरू केली आहे. (Corona)

ट्रायलसाठी 9 मुलांना दाखल करण्यात आले आहे. व्हॅक्सीनच्या या टप्प्याच्या चाचणीसाठी देशात 9 केंद्र निवडण्यात आली आहेत. यामध्ये पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा सुद्धा समावेश आहे.

डॉक्टर ललवानी यांनी सांगितले की, ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या चार मुलांच्या आई-वडिलांशी अगोदर चर्चा करण्यात आली होती.
त्यांनी म्हटले, भरती होत असलेल्या मुलांना स्थानिक भाशेत सल्ला देण्यात आला होता आणि ऑडियो व्हिज्युअल कन्सल्टिंग प्रक्रिया रेकॉर्ड करण्यात आली.

एकदा पालकांनी सहमती दिल्यानंतर, स्वयंसेवकाची RT-PCR टेस्ट आणि अँटीबॉडी टेस्ट होते.
मात्र, हे त्यांना ट्रायलचा भाग होण्यापासून रोखत नाही.

भारतात मुलांवर कोविडविरूद्ध व्हॅक्सीनची ट्रायलची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यामध्ये वय 2 ते 17 वर्ष आहे.
पुण्यात सुरू झालेल्या ट्रायल दरम्यान मुलांना 21 दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जातील.
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाकडून भारतात आणलेल्या नोवोव्हॅक्स व्हॅक्सीनचे भारतीय स्वरूप कोवोव्हॅक्स आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | झटका ! आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona | covid trials of covovax started in pune 7 11 year olds will be involved

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update