देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले – ‘कोरोना संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइऩ –  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान मंगळवारी (दि.1) पुन्हा एकदा राज्यातील सत्तांतराबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. कोरोना संकटामुळे (Corona crisis) राजकीय सत्तांतरासारख्या विषयाकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. हे कोरोना संकट (Corona crisis) ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू, असे सूचक विधान फडणवीसांनी केले आहे. तसेच ठाकरे सरकारवर रोज होणारे गंभीर आरोप, त्यातच पंढरपूरचा निकाल पाहता डॅमेज कंट्रोलची आम्हाला नाही, तर राज्य सरकारला गरज असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
त्याचवेळी शरद पवार यांच्या भेटीचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे.

ICC नं घेतले महत्त्वाचे निर्णय ! वनडे-टी 20 विश्वचषक संघाच्या संख्येत वाढ, चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल झाला ‘हा’ निर्णय

देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, माझा दौरा आज संपत नाही. मी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी येथे आलो आहे. यापुढे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांत मी जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. त्याठिकाणी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जाणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कामच असल्याचे ते म्हणाले.

कोण आहे 6 वर्षांची माहिरा इरफान, जिच्या आवाहनावर राज्यपालांनी कमी केली ऑनलाइन क्लासेची वेळ

शरद पवारांच्या भेटीचे कारणही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार हे आमचे वैचारिक विरोधक आहेत, पण ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांची खुशाली विचारायला मी भेट घेतली. मला कोरोना झाला होता. त्यावेळी पवार साहेबांसहित अनेक नेत्यांनी माझी फोनवर विचारपूस केली होती. तशी विचारपूस करण्यासाठी मी भेट घेतली. त्यामुळे पवारांच्या भेटीला राजकीय आयाम देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत.

त्यांनी मला मतदारसंघात आल्याने चहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली, असेही फडणवीस म्हणाले.
तसेच मराठा आरक्षण प्रश्नी आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला सरकारने बोलावले तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ.
नव्हे तर त्यांना पूर्ण सहकार्य करू पण त्यांनी राजकारण केले तर आम्ही राजकीय उत्तर देऊ.
या प्रश्नी संभाजीराजे यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अकारण वाद घालू नये, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

 

Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली कारवाई